Aaditya Thackeray | ‘ना खाती, ना इज्जत! ओरिजिनल गद्दारांसाठी…’, खातेवाटपावरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटला खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Govt) सामील होत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) आणि त्यांच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) नाराज असल्याची चर्चा आहे. यातच महत्त्वाची खाती अजित पवार गटाला मिळाली आहेत. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) उपस्थित केला आहे.

निधी मिळत नसल्याचा आरोप करत मविआ सरकारमधून बाहेर पडलेल्या शिंदे गटाकडून अजित पवारांना अर्थखातं देण्यास विरोध करण्यात आला. अखेर शुक्रवारी जाहीर झालेल्या खातेवाटपात अजित पवार यांना अर्थमंत्रीपद (Finance Minister) मिळालं. याशिवाय नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप जाहीर केलं. यावरुन ठाकरे गटाचे आमदार (Thackeray Group MLA) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत शिंदे गटाच्या आमदारांना खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर (Cabinet Expansion) 13 दिवसांनी खाते वाटप झालं… पहिले 20, नंतर 9 असा विस्तार झाला, अशी त्यांनी ट्विटची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना टोला लगावला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा (BJP) ने 33 देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!, अशा खोचक शब्दात आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं आहे. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार कसे प्रत्युत्तर देतात हे पहावे लागेल.

Web Title : Aaditya Thackeray | aditya thackeray trolls eknath shinde led shivsena mlas for not getting ministry departments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा