वरळीतील बीडीडी चाळीच्या विकासावरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळीच्या विकासावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मागच्या चार वर्षांपूर्वी या चाळीच्या विकासाचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फोडण्यात आला होता अजूनही इथे म्हणावे तसे विकासाचे काम झाले नाही. त्यामुळेच मला आज इथे यावे लागले.

या विषयावरून मला कसलेही राजकारण करण्यात स्वारस्य नसून येथील कामाला वेग आला पाहिजे. ते म्हणाले, लोकांचा आवाज ऐकला तर पुनर्विकास नक्कीच शक्य असतो. बीबीडी चाळीसाठी नेमलेल्या समितीत एकही शिवसेना आमदार नाही. त्यामुळे येथील शिवसेना आमदारांमध्ये नाराजी आहे असं ते आवर्जून बोलले.

वरळी, शिवडी येथील चाळीच्या विकासाचा चार वर्षांपूर्वी संकल्प करून अजूनही येथील चाळींचा विकास झाला नाही याचा आदित्य ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. मला कसलेही राजकारण करायचे नाही परंतु विकास झाला पाहिजे. हाच हेतू असल्यामुळे मला येथे यावे लागले.

पोलिसांना घरे मिळावी यासाठी लवकरच मुख्यमत्र्यांची भेट घेणार आहे. तीस वर्षावरील वास्तव्यास असलेल्या पोलिसांना हक्काची घरे मिळावी हीच भूमिका आहे. अशी घरे पोलिसांना दिली जातील असं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. मात्र अद्यापही पोलिसांना घरे मिळाली नाहीत. परंतु तीस वर्षापेक्षा कमी कालावधी घ्यावा असेही निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आम्ही लोकांसाठी काम करतो
बीडीडी चाळीच्या विकासासाठी नेमलेल्या समिती मध्ये शिवसेनेचा एकही आमदाराचा समावेश नाही. तरीही आम्ही लोकांसाठी काम करतो त्यामुळे समिती मध्ये नसल्यामुळे काहीही फरक पडणार नाही. सध्या गृहनिर्माण मंत्री भाजपकडे आहे तर म्हाडाचे अध्यक्षपद उदय सामंत यांच्याकडे आहे. पुढे ते म्हणाले कि, आम्हाला समिती पेक्षा लोकांमध्ये राहायला आवडते कारण आम्ही लोकांसाठी काम करतो.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like