Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | मावळ लोकसभेत आज महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रोड शो आणि प्रचारसभा होणार आहे. येथे वाघेरेंची लढत महायुतीचे (Mahayuti) उमेदवार श्रीरंग बारणेंशी (Shrirang Barne) होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संजोग वाघेरे यांनी विश्वास व्यक्त केला की, खोट्या आश्वासनांना, महागाईला जनता वैतागली असून ती आम्हालाच मते देणार.(Aaditya Thackeray In Maval Lok Sabha)

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजोग वाघेरे यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे दुपारी पिंपरी चिंचवड येथे पोहोतील. त्यानंतर जाहीर सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

रॅली आणि प्रचारसभेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, रोहित पवार
आणि शेकापचे बाळाराम पाटील सहभागी होणार आहे.

अर्ज भरण्यापूर्वी संजोग वाघेरे म्हणाले, कोणतीही निवडणूक ही महत्त्वाची असते.
विरोधात असलेला उमेदवार तगडा असल्याने आम्ही देखील तशीच तयारी केली आहे.
ज्या पद्धीतने रॅलीला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यावरुन मतदारराजाचा कौल आम्हाला मिळणार असून आमचा विजय निश्चित आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी