भारतात येणार ‘ही’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी, आदित्य ठाकरेंनी दिले आमंत्रण

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, त्यांनी इलोन मस्कला आपल्या राज्यात येण्यासाठी आमंत्रित केले आहे. इलोन मस्क हे टेस्ला इंक इलेक्ट्रिक कार कंपनीचे संस्थापक आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, टेस्ला यांना महाराष्ट्रात बोलवण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर मस्कशी चर्चा केली आहे.

महाराष्ट्र सरकार धोरणे पुढे करून राज्याच्या विकासासाठी काम करीत आहे यावरही ठाकरे यांनी भर दिला. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला उत्तर देताना इलोन मस्क यांनी लिहिले की, ‘पुढच्या वर्षी निश्चित’. या ट्विटसह त्यांनी टी-शर्टचा फोटोही शेअर केला होता, ज्यात ‘India wants Tesla’. असे लिहिले आहे. त्यांनी प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद देखील म्हटले आहे.

पुढच्या वर्षी भारतात येऊ शकते टेस्ला
या महिन्याच्या सुरूवातीस, टेस्ला इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांनी सूचित केले की, त्यांची कंपनी 2021 पर्यंत भारतीय बाजारपेठेत तेव्हा एन्ट्री करु शकेल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरावर आणि उत्पादनावर भर देतील.

ऑटो सेक्टरची परिस्थिती खराब
गेल्या एक वर्षात ऑटो सेक्टरची परिस्थिती खराब आहे. मागणीमध्ये सतत घट होत आहे. यानंतर, कोरोना व्हायरसच्या साथीने कार उत्पादकांची स्थिती आणखीनच बिकट केली आहे. आता या कंपन्यांना विक्री वाढवण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.