Aaditya Thackeray | शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप, ‘आदित्य ठाकरेंच्या बैठकीत दारु पार्ट्या झाल्याचे व्हिडीओ बाहेर काढू का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्ष यांच्यातील वाद सुरुच आहेत. आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका बैठीकीवरुन पुन्हा नवे वाद सुरु झाले. अब्दुल सत्तार यांनी एका बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? असे विचारले होते. त्यावरुन राजकारण चांगलेच तापले होते. आता शिंदे यांच्या गटातील (Shinde Group) आमदारांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या बैठकीतील दारु पार्ट्यांचे आपल्याकडे व्हिडिओ असल्याचे शिंदे यांच्या गटातील प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार हे मागील आठवड्यात परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी एका ठिकाणी त्यांनी चहापान केले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी (Collector) आणि अन्य लोकांचा ताफा होता. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेता का, विचारले होते. त्यांचा हा व्हिडीओ समाज माध्यामांवर टीकांचा धनी बनला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्यामुळे शिंदे यांचा गट देखील आक्रमक झाला होता. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील दारु पार्ट्यांचे आपल्याकडे व्हिडीओ आहेत, असे म्हंटले आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचे किती व्हिडीओ बघायचे आहेत, जर अशा पद्धतीने जाणार असाल, तर आम्हाला देखील व्हिडीओ बाहेर काढावे लागतील, असे पावसकर म्हणाले.

विरोधी पक्षातील लोक कोणत्याही कारणावरुन मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि उदय सामंत (Uday Samant) यांचे राजीनामे वरुण सरदेसाई
(Varun Sardesai) मागत आहेत. सरदेसाई कधी पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील निवडून आले नाहीत,
आणि आता ते राजीनामे मागत आहेत. आमच्या सरकारला येऊन तीन महिने झाले आहेत.
तुम्ही अडीच वर्षात काय केले ते सांगा, असे देखील पावसकर म्हणाले.

Web Title :- Aaditya Thackeray | kiran pawaskar slams aaditya thackeray warns over liquor party video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा