नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session 2022) प्रश्नोत्तरांच्या तासाला शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचा (Highway Accident) आणि शहरी भागातील ट्राफिकचा (Traffic) मुद्दा उपस्थित करताना शिंदे गटाला (Shinde Group) टोला लावला. त्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) चांगलेच आक्रमक झाले होते. गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) सभागृहातच ‘गेले तुम्ही आणि तुमचा विषयच आता संपला आहे’, असे प्रत्युत्तर दिले.
प्रश्नोत्तराच्या तासाला ठाकरेंनी राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले.
मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या ट्राफिकचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ठाकरेंनी मुंबई-सुरत रस्त्याचा (Mumbai-Surat Road) उल्लेख केला. ‘माझी सरकारला एक सूचना अशी आहे, की रस्ते बनवताना अलिकडे एक रस्ता असा आहे, की 40 लोक रात्रीही पळून जायचे आणि दिवसाही पळून जायचे तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत मार्ग, मग या रस्त्याची क्वालिटी तपासून पाहावी आणि तसा रस्ता जर बनला तर पळता येते, धावता येते आणि तिथून गुवाहटीलाही जाता येते’ असे ठाकरे म्हणाले.
Web Title :- Aaditya Thackeray | look at the surat road where 40 people fled aditya thackeray attack and gulabrao patil became aggressive give reply
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान