मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर भाष्य केले आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी मुंबई जन्मभूमी कर्मभूमी आहे, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यावेळी शिंदे फडणवीस सरकारला म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) यावेळी मुंबई महानगरपालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे जाहीर केले होते. पण, आता हे टेंडर रिकॉल करण्यात आल्याची माहिती ठाकरेंनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर कोणाचे नियंत्रण आहे, तेथील प्रशासन कोण चालवत आहे, येथील कामकाजाच्या कागदांवर कोणाच्या सह्या होतात, असे प्रश्न उपस्थित केले.
मुंबईत सध्या ‘3 टी’ काम सुरु आहे. टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
शिंदे सरकारने महानगरपालिकेच्या कामांवर कोणतीही स्पष्टता केली नाही.
गेल्या तीन महिन्यात मुंबईत किती पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या,
त्यांना मंजुरी कोणी दिली, त्याची प्रक्रिया कशी झाली, असे अनेक प्रश्न यावेळी ठाकरेंनी उपस्थित केले.
नगरसेवकांच्या हक्कांच्या 1700 कोटी रुपयांत घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
मुंबईला शिवसेनेने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईला देशात आणि जगात नावलौकीक मिळविण्याचा आम्ही प्रयत्न केला.
मात्र, शिंदे सरकार मुंबईचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या केल्या जात आहेत.
शिंदे सरकार केवळ वेळ काढूपणा करत आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
Web Title :- Aaditya Thackeray | mumbai is not a hen that lays golden eggs for us it is our homeland workplace says aditya thackeray on mumbai muncipal corporation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले
Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू