Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याचदरम्यान पुन्हा एकदा नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सुमारे ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे समजते. तसेच हा पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशी माहिती आहे. (Aaditya Thackeray)
शिवसंवाद दौऱ्याच्या (Shivsamvad Tour) माध्यमातून आजपासून आदित्य ठाकरे हे नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यातील दोन दिवस ते नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र अशातच ठाकरे गटातील (Shivsena Thackeray Group) सुमारे ५० हून अधिक शिवसैनिक शिंदे गटात (Shivsena Shinde Group) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्का दिल्याचे नाशिकच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ठाकरे गट डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी वेळोवेळी संवाद दौरे घेत असताना देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. हा ठाकरे गटासाठी नाशिकमध्ये चिंतेचा विषय असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये शिवसेना (Nashik Shivsena)
पक्षात फूटीनंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी शिंदे गटासोबत जाणे पसंत केले.
दर पंधरा दिवस किंवा महिन्याने ठाकरे गटातून शिंदे गटात शिवसैनिक प्रवेश करत आहेत. यापूर्वी सेनेचे नाशकातील दिग्गज म्हणुन ओळखले जाणारे अजय बोरस्ते (Ajay Boraste) आणि भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांनी देखील यापूर्वीच ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. तर आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे जेष्ठ नेते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
मागील काही दिवसांचा विचार करता, जेव्हा जेव्हा ठाकरे गटातील नेते नाशिक दौऱ्यावर आले,
तेव्हा तेव्हा ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मागील दोन वेळी संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आले असता,
मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
तर आता आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत असताना देखील मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक शिंदे गटात
प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला डॅमेज कंट्रोल रोखण्यात अपयश येत असल्याचे देखील बोलले जात आहे.
तसेच ठाकरे गटाने याचे चिंतन करायला हवे. अशी देखील चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात आहे.
Web Title :- Aaditya Thackeray | Near about 50 thackeray sena leaders joins eknath shinde sena in nashik on aditya thackeray tour
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bigg Boss 16 | प्रेक्षकांसमोर डान्स करताना ‘शालीन – अर्चना ‘चा तोल गेला अन्…
Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी