Aaditya Thackeray On BJP | ‘एकट्या आदू बाळानं सगळ्यांना सळो की पळो केलंय‘ – आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : Aaditya Thackeray On BJP | एका आदू बाळाने यांना किती सळो की पळो केले आहे. देशात एक पप्पू नाव ठेवले, त्यांनी यांना हलवून ठेवल आहे आणि इकडे आदू बाळ. माझ्या नावात बाळ लावले याचा अभिमान आहे. कारण, माझ्या आजोबांचे नावही बाळच होते. मात्र, यांच्या भाषेतून यांच फ्रस्टेशन आणि चीप विचार दिसून येतात, असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. (Aaditya Thackeray On BJP)

मुंबईतील मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह, विधानसभा अध्यक्ष, उद्योग मंत्री व अन्य मंत्र्यांच्या परदेश वारीवर निशाणा साधला होता. यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी संभाजी नगरमध्ये प्रत्युत्तर दिले. (Aaditya Thackeray On BJP)

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही जी भाजपा पाहायचो ती वाजपेयी साहेबांची होती, अडवाणीजी यांची होती. आता ही नवी भाजपा आहे का, ही भाषा नव्या भाजपाची आहे का? असा सवाल त्यांनी केला.

मातोश्रीत काय म्हणाले होते आदित्य

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह, विधानसभा अध्यक्ष व अन्य मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, राज्य सरकारमध्ये अनेकांना परदेश दौरा करायला आवडते. परदेश दौरे म्हणजे सुट्टी समजायला लागले आहेत. तुम्हाला कुठे जायचे तिथे जा; पण जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको.

आदित्य म्हणाले, अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केलेला नाही. मुख्यमंत्री जर्मनीला जाऊन हायवे पाहणार होते. त्यांच्याकडे इतकी वर्षे एमएमआरडीएचे खाते आहे. मग, आता तिथे जाऊन काय हायवे बघायचे? असा सवाल करत आदित्य यांनी फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर आणि उद्योगमंत्र्यांच्या विदेश वारीवर टीका केली होती.

आशिष शेलार काय म्हणाले

आदित्य यांच्या मंत्र्यांच्या परदेश वारीवरील टीकेला उत्तर देताना आशीष शेलार (Ashish Shelar) म्हणाले,
वडील आजारी असताना सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचे नसते.

नितेश राणे काय म्हणाले

आदित्य यांच्या मंत्र्यांच्या परदेश वारीवरील टीकेला उत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)
यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले की, बाबा आजारी असताना सरकारी पैशातून व्हॉईस थेरेपी करत होता
आणि कोणत्या कोकिळेसोबत सूर आळवला होता. त्यामूळे आल्यावर आई कशी रागवली
हा सर्व खराखुरा तथ्यात्मक कंटेट मांडू शकतो. त्यामुळे आपली फेक बोंबाबोम फॅक्टरी तात्काळ बंद करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LPG Commercial Gas Cylinder Price | सणासुदीत सर्वसामान्यांना झटका ! गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ