Aaditya Thackeray On BJP | घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर- काँट्रॅक्टर मित्रांमुळे पुण्यातील सुविधांचा बट्ट्याबोळ; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Aaditya Thackeray On BJP | पुण्यातील स्मार्ट सिटीचे (Pune Smart City) वाभाडे निघत आहेत. पुण्यात झालेल्या पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अक्षरशः पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam In Pune) पाहायला मिळाली. महापालिकेच्या कार्यपद्धतीवर पुणेकरांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले. (Pune Rains)

जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे- नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्यात ही परिस्थिती ओढवली आहे. पुणे शहरामध्ये तासभर जोरदार पाऊस झाला की, ठिकठिकाणी ड्रेनेजलाइन तुंबली जाते. पूरस्थिती निर्माण होते. परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो.(Aaditya Thackeray On BJP)

आदित्य ठाकरेंनी या पावसानंतर ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. “घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपाच्या बिल्डर-काँट्रॅक्टर मित्रांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील पायाभूत सुविधांचा बट्याबोळ केलेला आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
‘रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन’ असो, वेताळ टेकडीची लावलेली वाट असो, की नालेसफाईतला घोळ असो.
पहिल्या पावसातच जर पाणी तुंबायला लागलं असेल आणि जनजीवन विस्कळीत होत असेल तर ते पुण्यासाठी धोकादायक आहे.

चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास
ह्यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचे जीवन त्रासदायक झालेले आहे”, असे ठाकरे म्हणाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar On Traffic Police | पुणे : वाहतूक पोलीस आयुक्तांच्या रडारवर, वाहनचालकांकडून पैसे घ्याल तर खंडणीचा गुन्हा दाखल होणार

Narhe Pune Crime News | पुणे : इस्टेट एजंटने गोळ्या झाडून संपवलं जीवन, नऱ्हे परिसरातील घटना

Pune Lok Sabha Election 2024 | वसंत मोरे यांच्यासह 33 जणांचे डिपॉझिट जप्त; जाणून घ्या

Murlidhar Mohol | राज्यातील सहकार क्षेत्रावर पकड मिळविण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ‘सहकार’ मंत्रालयाची जबाबदारी !