Aaditya Thackeray On Election Commission | मतदानाचा टक्का कमी का झाला? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, निवडणूक आयोगावर केले आरोप

मुंबई : Aaditya Thackeray On Election Commission | निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक बूथवर जावून पाहणी केली. या पाहणीत त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज मतदानासाठी सगळे मुंबईकर सकाळपासून बाहेर पडले आहेत. पण प्रश्न हा आहे की मुंबईतील पोलिंग बूथवर सोयीसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत. पंखेसुद्धा नाहीत. एक दोघांना चक्करसुद्धा आली. पाण्याची सोय नाही. सावलीत कुठे रांगा उभ्या केल्या नाहीत.

ठाकरे म्हणाले, ही पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. इलेक्शन कमिशनकडून फोन आणि मेसेज येत होते. सेलिब्रिटींना घेऊन व्हिडीओ येत होते की व्होट करा. पण आम्ही मतदान करत असताना मतदानाचा टक्का कमी होत आहे. त्याला काही कारणे आहेत.

आदित्य म्हणाले, काही ठिकाणी लोक रांगेत उभे आहेत.
काही ठिकाणी घड्याळ घालायचे की नाही घालायचे,
फोन आत न्यायचा की नाही न्यायचा, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे,
यामुळे मतदानाचा टक्का घसरत आहे. मतदान नीट होण्यासाठी मतदारांना मदत करावी.

आज मुंबईकर मतदानाला उतरले. पण निवडणूक आयोग स्लो आहे.
बूथवर जाऊन पहा. काही ठिकाणी मुद्दाम हे केले जात आहे.
मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे.
आज आम्हाला नको तर लोकांना विचारा, असे ठाकरे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती

Pune BJP On Kalyani Nagar Accident | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात भाजप आक्रमक,
रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब व बारवर कारवाई करण्याची मागणी