Aaditya Thackeray on Raj Thackeray | ‘दर चार वर्षांनी कपड्यांचे रंग बदलून…”; मंत्री आदित्य यांचा थेट ‘काका’ राज ठाकेरेंवर निशाणा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीच्या भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

आदित्य ठाकरे मुंबईमधील गिरगाव (Girgaon) येथे हनुमान मंदिरातील प्रतिष्ठापनेसाठी आले होते. यावेळी त्यांना भगवा कुर्ता घातल्याबद्दल विचारलं. त्यावर बोलताना, दर चार वर्षांनी कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व (Hindutva) येत नाही, ते रक्तात असावं लागतं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 

हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) गिरगावच्या हनुमान मंदिरात (Maruti Temple) आदित्य ठाकरे यांनी महाआरती केली. राज ठाकरेंनी देशभरात हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं होतं. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेक ठिकाणी महाआरतीचं नियोजन केलं होतं.

 

दरम्यान, राज ठाकरेंवर टीका केल्यावर पुण्यातील (Pune) मनसे कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
यावर आता राज ठाकरे काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :-  aaditya thackeray reaction on raj thackeray and hindutva

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा