… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही, दरेकरांचा सरकारला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सह्याद्री अतिगृहात (sahyadri Guest House) प्रशासकीय अधिकाऱ्यांची (Administrative Officers) बैठक घेत होते. त्यावेळी बैठकीच्या बाहेर शोभेचं मोठं झुंबर (Slab with POP design) त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळलं. या घटनेवरुन भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. गेस्ट हाऊसचा (Guest House) स्लॅब कोसळताना जर सरकारला कळत नसेल, तर ‘आमचं सरकार पडणार नाही’ म्हणणाऱ्यांना हा एक संकेत आहे की काय असं मला वाटतं, असं दरेकर म्हणाले.

सरकारचा नवा नियम ! इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, मिळणार नवीन सुविधा

सरकार कधी कोसळेल कळणार नाही

सह्याद्री अतिगृहात हे सरकारचं प्रमुख बैठक ठिकाण आहे.
अशा ठिकाणचा स्लॅब कोसळत असताना जर सरकारला कळत नसेल तर हा आमचं सरकार पडणार नाही म्हणणाऱ्या सरकारसाठी हा संकेत आहे की काय असं दिसतंय.
आदित्य ठाकरे हे त्यावेळी तेथे होते त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही ही सुदैवाची बाब आहे.
जर स्लॅब कोसळताना त्यांना समजत नसले, तर सरकार कधी कोसळेल हेदेखील त्यांना कळणार नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला.

किशोरी पेडणेकर त्रस्त

दरेकर पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री (CM) होते.
सध्या विरोधी पक्षातही ते चांगले काम करत आहेत त्यांना आणि भाजपला (BJP) एक जनाधार आहे.
त्यामुळे आम्हाला फ्रस्ट्रेशनमध्ये जाण्याचे काहीच कारण नाही.
आमच्या अशी टिप्पणी करणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) या सध्या त्रस्त दिसत आहेत. फ्रस्ट्रेशन (Frustration) हे चेहऱ्यावर दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.

आमचे नेते प्रसन्न चेहऱ्याने वावरतात

फडणवीस आणि भाजप नेते वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे करत आहेत.
आमचे नेते प्रसन्न चेहऱ्याने वावरत आहेत.
जनतेची विचारपूस करत आहे.
परंतु मुंबईच्या महापौर आणि काही नेतेमंडळीच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकराचा त्रास दिसतोय, असा टोला दरेकर यांनी किशोरी पेडणेकर यांना लागावला.