Homeताज्या बातम्याAaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर;...

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभुमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खंडाजंगी सुरु आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणुका आहेत. यामुळे अनेक पक्षानी आपली मोट बांधयला सुरुवात केलीय. अशातच दुसरीकडे आता ठाकरे बंधु परस्परास आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर (Shivsena) ताशेरे ओढले आहे. यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पलटवार केला आहे.

अमित ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहे. शहराची अवस्था पाहून शिवसेनेकडून अपेक्षा ठेवून काहीच मिळणार नाही, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. त्यावेळी रस्ते असे बनतातच कसे ज्याला खड्डे पडतात. आम्ही नुसते बोलत नाही करून दाखवले, मुंबईकरांना (Mumbaikar) खड्डे मुक्त रस्ते हवे असतील तर सत्ता बदल हा एकमेव मार्ग आहे. नाशिकमध्ये खड्डे शोधून सापडत नाही. मी आज एकदिवस वेळ वाचावा म्हणून लोकलने जात आहे. पण ज्यांना रोज येजा करावी लागते त्यांचे फ्रस्ट्रेशन काय असेल? असं म्हणत त्यांनी खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता.

अमित ठाकरे यांच्या टीकवरुन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,
आपल्या सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे, बीएमसीवर विश्वास आहे.
आपण जे काम करतो ते काही एका रात्रीत होणार नाही, ते काम आपल्याला दिसायला लागतं करावा लागतं,
असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अमित ठाकरेंना दिलं आहे.

Web Title :- Aaditya Thackeray | son of uddhav thackeray and shivsena minister aaditya thackeray reply to brother amit thackeray after his criticism over potholes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Booster Dose | भारतीय नागरीकांना कोरोना लसीचा Booster डोस दिला जाणार? तज्ज्ञ म्हणाले…

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या ESIC च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 3 महिन्यांचा पगार

Hotel and Restaurant Association Western India | राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ रात्री 1.30 पर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News