Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपालांनी केलेल्या भाषणात महाविकास आघाडीच्या काळातील काम आणि निर्णय होते. राज्यपालांचे भाषण ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की त्यांची दिशाभूल केली की काय? याबाबत आम्ही माहिती घेणार असल्याचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही म्हणू द्या, त्यांनी सहा महिन्यात बारावं कारण दिलंय पण एक लक्षात घ्या की गद्दार हे गद्दारच असतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीकास्त्र सोडलं.

एकनाथ शिंदे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी केली होती. याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मागच्या सहा महिन्यात गद्दारी करण्याचं हे बारावं कारण दिलं आहे. त्यामुळे आता काय बोलणार? एक लक्षात घ्या गद्दार हे गद्दारच राहणार त्यांच्यावर लागलेला हा शिक्का पुसला जाणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटले.

विधीमंडळाच्या प्रांगणात आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी त्यांना पक्ष कार्यालयाचं काय होणार? असं विचारलं असता आता लवकरच आम्ही तुमच्यासोबत येऊन
बसतो असं त्यांनी मिश्कीलपणे म्हटलं आहे. तसेच सभागृहात आम्ही जिथे बसायचं तिथेच बसलो होतो,
गद्दार कुठे गेलेत ते त्यांनाच विचारा असं म्हणत आणखी एक टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि
आमदारांना लगावला आहे.

Web Title :- Aaditya Thackeray | thackeray group mla aditya thackeray slams eknath shinde about his so called rebel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही; नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले’ – अजित पवार

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढला, भाजपने अखेरच्या क्षणी सामना फिरवला?

Kolhapur Crime News | कोल्हापुरात काका-पुतण्यामध्ये जोरदार भांडण; एकमेकांवर धारदार शस्त्राने केले वार