Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’; आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक शब्दात टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. याच दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) खोचक शब्दांत टीका केली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून शिवसेनेत (Shivsena) उत्साहाचं वातावरण आहे. कारण आता घाण निघून गेली. यापुढे जे काही होणार ते चांगलंच होणार, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली.

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघितल्यानंतर मला तोच दिवस आठवतो जेव्हा मी माझी उमेदवारी जाहीर केली होती. माझा आवाज जरी इथपर्य़ंतच हॉलमध्ये येत असला तरी तुमचा आवाज गुवाहाटीपर्यंत पोहोचला आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितलं की, मुंबई आणि मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) सगळ्यांचा डोळा आहे. भास्करराव तुम्ही बरोबर बोललात की, मुंबईवर भाजपचा (BJP) डोळा आहे. मुंबईत एवढे वर्ष आपण शिवसेना म्हणून राहिलो आहेत जरी मुंबईवर कुणाचा डोळा असला तरी आपण मुंबईला कोणाची नजर लागू दिलेली नाही.

 

एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, हैराण देखील होतो. पण ठिक आहे, राजकारण म्हटल्यानंतर लोकं कशी बदलू शकतात हे आपण अनेक वर्ष बघितलं आहे.
पण हाच प्रश्न सतावतो की आपण या लोकांनी कधी कमी केलं आणि काय कमी दिलं? कित्येक लोकांवर अन्याय झाला.
हे आता दिसून येतंय. कालपण कल्याण-डोंबिवलीवरुन कार्यकर्ते आले की त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही.
मातोश्रीवर आल्यावर त्यांचे फोन यायचे की तुम्ही तिथे का गेले म्हणून, हे आम्ही दुर्लक्ष केलं. आज पक्षप्रमुखांनी देखील सांगून दाखवलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कोविडच्या कठिण काळात महाराष्ट्राला दिशा देणारा, सर्वांची काळजी घेणारा,
घरातला नाव घेणारा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे नाव प्रसिद्ध झाले आहे.
ग्लासगोला जाताना त्यांनी सर्जरी होती तेव्हाही त्यांनी मला थांबवलं नाही. त्या ठिकाणीही त्यांचं कौतुक करण्यात आलं.
राज्यासाठी आम्ही 80 हजार कोटींचे करार केले, पण आपल्याला विकण्यासाठी करार केले नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

 

Web Title :-  Aaditya Thackeray | yuwa Sena leader aaditya thackeray slams rebel mlas of shiv sena in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज, सुखसागरनगरमध्ये वाहतुकीची अभुतपूर्व कोंडी

 

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने आलिया, कतरीना, दीपिकाला पाजले पाणी, ‘या’ बाबतीत केली मात!

 

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा