‘बोल्ड’ अभिनेत्री अहाना कुमरा म्हणते, मला ‘ते’ सिनेमे करायला जास्त ‘आवडतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सिनेमा लिपस्टिक अंडर माय बुरका या सिनेमात बोल्ड भोपाळी मुलीचा रोल करत लोकांच्या नजरेत आलेली अभिनेत्री अहाना कुमराने नुकतंच प्रकाश झा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर अहाना चांगलीच चर्चेत आली आहे. तिने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्हीदेखील चकित व्हाल. आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.

तुम्हाला सांगू इच्छितो की, जी 5 च्या योर्स ट्रुली या सिनेमात पु्न्हा ती बोल्ड अंदाजात दिसणार आहे. या सिनेमात ती सोनी राजदान, पंकज त्रिपाठी आणि महेश भट्ट यांच्यासोबत ती काम करणार आहे. या वर्षीच्या सुरुवातीस अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमात काँग्रेसच्या महासचिव प्रियंक गांधींच्या रोलमध्ये अहाना दिसली होती. या सिनेमाशी तिला खास लगाव आहे.

प्रियंका गांधींचा रोल करणारी अहाना म्हणते की, “जर असा रोल पुन्हा मिळाला तर राजकीय विषयांना जाणून घेण्यासाठी मी अशा प्रकारच्या आणखी काही सिनेमात काम करणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, 2019 च्या सुरुवातीस हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर आधारीत आहे. अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांचा रोल केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like