Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांच्या पोस्टने वेधले लक्ष ; “एका जन्मात अनेक जन्म……

पोलीसनामा ऑनलाईन   : Aai Kuthe Kay Karte | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती  मालिका ठरत आहे. तर टीआरपी मध्ये देखील ही मालिका नेहमीच वरच्या क्रमांकावर असते. मालिकेतील कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना आपलेसे वाटते. एवढेच नाही तर मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते देखील आहेत आणि ते या कलाकारांच्या सोशल मीडियाला नेहमीच फॉलो करत असतात. या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनिरुद्ध देशमुख (Anirudha Deshmukh)ही व्यक्तिरेखा साकारतात. सध्या मिलिंद गवळी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरात वायरल होत आहे. (Aai Kuthe Kay Karte)

मिलिंद गवळी हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात विविध फोटोज आणि व्हिडिओज सतत ते आपल्या इंस्टाग्राम फेसबुक वरून शेअर करत असतात. तर नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांचे वर्णन त्यांनी केले आहे. तर या भूमिकेचे फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करत मिलिंद गवळी म्हणतात, “एका जन्मात अनेक जन्म…… मला आठवतं की पृथ्वीराज कपूर म्हणाले होते की एक अभिनेता हा परमेश्वराच्या खूप जवळचा असतो कारण त्याला एका आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगायला मिळतात. हे अगदी खरं आहे बाकीच्या क्षेत्रांमध्ये आपण वर्षानुवर्ष एकच भूमिका साकारत असतो. बँकेत काम करणारा 30-35 वर्ष बँकेतच काम करत असतो. जर कोणी डॉक्टर असेल तर तो आयुष्यभर डॉक्टर कीच करतो. माझे वडील पोलीस खात्यात होते त्यांचे आयुष्य पोलिसातच गेले पण मी अनेक वर्ष अनेक भूमिका केल्या. मी एकाच भूमिकेत अडकलो नाही. कित्येक भूमिका मी या 30 वर्षात साधल्या आहेत.
पण खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला या जन्मामध्ये किती जन्मांचे वेगवेगळे आयुष्य जगायला मिळाले”. (Aai Kuthe Kay Karte)

तर सध्या मिलिंद गवळी यांची ही पोस्ट प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे दिसते आहे. तर ‘आई कुठे काय करते’
ही मालिका सध्या अनेक वळणे घेत असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली आहे.
तर या मालिकेतील मिलिंद गवळी यांची भूमिका देखील दिवसेंदिवस लोकांना आकर्षित करत आहे.
अभिनेते मिलिंद गवळी गेले कित्येक वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत ‘आई कुठे काय करते’ या
मालिकेतून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

Web Title :- Aai Kuthe Kay Karte | aai kuthe kay karte milind gawali aka anirudha share instagram post talk about different role

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, चाकणमधील शिवसेना भवन समोरील घटना

Rivaba Ravindra Jadeja | क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल