अभिनेत्री अलका कुबल यांना धमक्यांचे फोन ! घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आई माझी काळूबाई या (Aai Majhi Kalubai) मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) आणि प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) गेल्या अनेक दिवसांपासून वादामुळं चर्चेत आहेत. आधी तर मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि प्राजक्ता यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. यानंतर आता हा वाद भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

अलका आणि प्राजक्ता यांच्यात सुरू असलेल्या आरोपांच्या फैरीवरून अलका यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनवधानानं छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आणि नवा वाद सुरू झाला. यामुळं अलका कुबल यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली.

अलका यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. या भेटीत उदयनराजेंनी अलका यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यानंतर त्यांनी प्राजक्तासोबतही फोनवरून चर्चा केली. दोघींनी हा वाद लवकरात लवकर मिटावावा, अशी विनंती त्यांनी केल्याचं समजत आहे.

काय आहे वाद ?
आई माझी काळूबाई या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि मालिकेतील सहकलाकार रवी सांगळे (Ravi Sangle) यांच्यात वाद झाल्यानंतर प्राजक्ताला मालिकेतून काढण्याl आलं. यावेळी अलका यांनी अनेक आरोप केले. सेटवर उशिरा येणं, नाना नखरे करणं, कोरोना काळात परीक्षा असल्याचं सांगत टाळाटाळ करणं, नेहमी सुट्टी मागणं, सीनियर कलाकारांना तासनतास वाट पाहायला लावणं, अनेक अटी घालणं असं करायची, असं अलका यांनी सांगितलं. आम्ही प्रचंड मनस्ताप सहन केला, असंही त्या म्हणाल्या.