शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटलेलं कसं चालत ? भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्याने भाजपवर टीका होत आहे. भाजपला टीकेला सामोरे जावे लागत असताना राज्यातील भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना स्पष्टीकरण देत प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाणारी जाणता राजा ही उपाधी शरद पवारांना दिली जाते. त्यांच्या कर्यकाळात राज्यात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे त्यांना ही उपाधी लागू होते का ? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ य पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका मंडली. पक्षाची भूमिका मांडत असताना मुनगंटीवार यांनी विरोधाकांवर टीकास्त्र सोडले. जो पर्य़ंत ब्रह्मांड आहे तोपर्य़ंत शिवाजी माहाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली होती. मात्र, त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते आणि हा वाद मिटला होता, अशी आठवण त्यांनी विरोधकांना करून दिली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेसचे लोक ‘इंडिया इस इंदिरा, इंदिरा इस इंडिया’ असे म्हणत होते. शिवाय इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा मातेशी करण्यात आली होती. मात्र, कुणीच आक्षेप घेतला नाही असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा ही उपाधी दिली गेली आहे. पण हीच उपाधी शरद पवारांना देखील दिली जाते. त्यांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हटलेलं चालतं का ? त्यांना ही उपाधी लागू होते का ? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/