Aam Aadmi Party | ठाणे मनपा निवडणूकीत ‘आप’ची एन्ट्री, सत्ताधारी आणि विरोधकांची वाढली डोकेदुखी

ठाणे: पोलीसनामा ऑनलाईन – उत्तरेकडील दोन राज्यांत घसघशीत यश मिळाल्यानंतर अरविंद केजरीवालांची (Arvind Kejriwal) आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) दक्षिण दिग्विजयासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये (Gujarat Assembly Election) ‘आप’ची (Aam Aadmi Party) कामगिरी महत्वाची ठरणार आहे. पण त्यांची ही मोहीम गुजरात पुरती मर्यादित राहणार नसून ती महाराष्ट्रात देखील शिरकाव करणार आहे.

महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेतले गृहयुद्ध (Shivsena), भाजपा (BJP) -राष्ट्रवादीतील (NCP) वैचारिक वाद आणि काँग्रेस (Congress) व मनसे(MNS) यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न उभा असताना, ‘आप’ने  दिल्ली व पंजाब प्रमाणे ठाणेकरांना (Thane Municipal Corporation) सुद्धा मोफत पाणी, वीज, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवा देण्याचे आमिष दाखवले आहे. त्यासाठी ठाणेकरांना ‘आप’ला एकहाती सत्ता द्यावी लागणार आहे. आमच्या ‘भष्ट्राचार मुक्त ठाणे’ या संकल्पनेवर ठाणेकर प्रतिसाद देतील, याची खात्री आपला आहे. शनिवारी ठाण्यात आपची पत्रकार परिषदेत पार पडली. त्यावेळी आपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दिल्ली, पंजाबमध्ये मिळालेल्या यशानंतर अरविंद केजरीवाल पक्षाचा विस्तार करत आहेत.
मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना गोव्यात समाधानकारक यश मिळाले आहे.
तर पंजाब मधील यशाने त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. ‘आप’च्या राष्ट्रीय पक्ष होण्याच्या स्वप्नांना
जर पूर्णत्व मिळवायचे असेल तर त्यांना इतर राज्यातही स्वतःची मुळे घट्ट रोवावी लागतील.
त्यामुळे त्यांचे हे मोफत सुविधा वाटपाचे प्रारूप महाराष्ट्रात चालते की नाही,
याचा अंदाज ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येईल.

Web Title :- Aam Aadmi Party | aam aadmi party aap to contest in thane municipal elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता’

Chandrakant Patil | ‘एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर चित्रपटगृहाबाहेर गळ्यात पाट्या लावून उभे राहा’ – चंद्रकांत पाटील