‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत ‘आप’ला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता ‘आप’ने इतर काही राज्यांत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

 

 

 

 

आम आदमी पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यात येत्या 2 वर्षांत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती स्वत: अरविंद केजरीवाल यांनी दिली. त्यानुसार, आता दिल्लीनंतर या सहा राज्यांत यश मिळेल का, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.

दिल्लीतील हिंसाचार दुर्दैवी

प्रजासत्तादिनी राजधानी दिल्लीत जो काही हिंसाचार झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. या हिंसाचारास जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देतो, पण हे सर्व करताना शांततापूर्ण मार्गाने व्हावे, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.