Aam Aadmi Party (AAP) Pune | विसर पडलेल्या हक्कांची जाणीव ‘आप’ने करुन दिली – विजय कुंभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party (AAP) Pune) विसर पडलेल्या हक्कांची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून देत आहे. नगरसेवक (Corporator) म्हणजे सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेला नोकर असतो. हा नोकर जर काम करत नसेल तर मालकाला पुढे यावे लागेल आणि नोकराच्या खुर्चीत बसावे लागेल. म्हणूनच ‘आपणच होऊ नगरसेवक’ ही मोहीम (Campaign) सुरू करण्यात आली आहे, अशा शब्दांमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party (AAP) Pune) प्रदेश संयोजक पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (Pune City Working President Vijay Kumbhar) यांनी या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

 

पुण्याच्या बालगंधर्व मंदिरामध्ये (Balgandharva) आगामी पालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर नागरिकांचा आणि इच्छुकांचा मेळावा भरवण्यात आला. ‘भ्रष्टाचार संपवणार, आम आदमीचे (Aam Aadmi Party (AAP) Pune) सरकार’ ही मेळाव्याची प्रमुख संकल्पना होती.

 

रिक्षाचालकांपासून (Rickshaw Driver) निवृत्त न्यायाधीशांपर्यंत (Retired Judges) शेकडो सामान्य नागरिकांची उत्स्फूर्त आणि उत्साही गर्दी झाल्याने संपूर्ण सभागृह भरून गेले होते. प्रेक्षागृहाबाहेरही 400 ते 500 आम आदमी कार्यक्रम ऐकत उभे होते. ‘आम आदमी पार्टीचा झाडू फिरवू, भ्रष्टाचार (Corruption) साफ करू’ हा मुद्दा वक्त्यांनी मांडला.

 

पुणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्त्या तारा मैत्रेय, निवृत्त न्यायाधीश मंजुषा नयन (Retired Judge Manjusha Nayan), पक्षाच्या वाहतूक समितीचे प्रदेश संयोजक श्रीकांत आचार्य (Srikant Acharya), पुणे शहर प्रवक्ते डॉ.अभिजीत मोरे (Pune City Spokesperson Dr. Abhijeet More) तसेच जनसंपर्क अधिकारी प्रभाकर कोंढाळकर (Prabhakar Kondhalkar), सुदर्शन जगदाळे (Sudarshan Jagdale), कृष्णाजी गायकवाड (Krishnaji Gaikwad) आदी व्यासपीठावर होते. भ्रष्टाचार मुक्त सुशासन आणि विकासाचे दिल्ली नव्हे, पुणे मॉडेल या मुद्याला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये साथ दिली.

शहरातील सर्व 173 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. इच्छूकांपैकी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीच्या रिक्षा संघटनेचे किरण कांबळे, प्रेरणा बनसोडे, सना शेख, ज्योती ताकवले, कृष्णाजी गायकवाड, निवृत्त जवान संतोष चौधरी, राहुल म्हस्के, अ‍ॅड. दत्तात्रय भांगे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अभिजित मोरे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि पारंपरिक राजकीय पक्षांनी चालविलेल्या उघड भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. बोगस अभियंता घोटाळा, गवंडी सुतार बनले अभियंता, कचरा घोटाळा, किमान वेतन घोटाळा, मालमत्ता सर्वेक्षण घोटाळा, जम्बो हॉस्पिटल ठेक्यामधील भ्रष्टाचार, समान पाणी पुरवठा योजना या फसव्या योजनेत खर्च झालेले अडीच हजार कोटी, तसेच कोरोनाच्या काळात धूळ खात पडून असलेली पालिका रुग्णालये अशा मुद्यांकडे लक्ष वेधले.

 

डॉ. मोरे यांनी स्मशानभूमीचे खाजगीकरण, झाडांविषयी झालेले भ्रष्ट कारण आदी अनेक मुद्द्यांचा उहापोह केला.
125 एकर क्षेत्र असलेल्या 270 अ‍ॅमिनिटी स्पेस मोकळ्या जागा 90 वर्षांच्या करारावर विकत
देण्याचा भाजपचा (BJP) आम आदमी पार्टीने हाणून पाडलेला डाव यावरही भाष्य केले.

सभागृहातील प्रचंड गर्दीचा उल्लेख भाषणात करून विजय कुंभार म्हणाले की या गर्दीचे सांगणे असे आहे
की आता आम्हाला पुण्यामध्ये आम आदमी पक्ष हवा आहे.
या पक्षाने विसर पडलेल्या हक्कांची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून दिली. देशभर अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे.
‘नाही रे ‘ वर्गाला आपल्या हक्कांची मुळीच जाणीव नाही.
त्यांना हक्कांचा विचार करण्यासाठी वेळच मिळू नये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली गेली आहे.
अशा नाही रे वर्गासाठी आता आपल्याला मैदानात उतरावे लागेल.

 

दरम्यान, पुणे शहर रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांच्या विधवांना परमिट हस्तांतरणाचा कार्यक्रम संयोजकांच्या हस्ते पार पडला.
सर्व रिक्षा चालकांचा प्रातिनिधिक म्हणून अशोक शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. आनंद अंकुश यांनी सूत्र संचालन केले.

 

Web Title :- Aam Aadmi Party (AAP) Pune | AAP made us aware of the forgotten rights – Vijay Kumbhar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने वार करणारी 5 जणांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Ravi Rana | ‘ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार’ – आमदार रवी राणा

 

Multibagger Stocks | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 1 लाख झाले 1.7 कोटी