Aam Aadmi Party (AAP) Pune | आम आदमी पार्टी पुणेच्या वतीने वारजे येथे शाखा फलकाचे उद्घाटन

पुणे : Aam Aadmi Party (AAP) Pune | आम आदमी पार्टी पुणेच्या वतीने वारजे (Warje Malwadi) येथे शाखा फलकाचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. उद्घाटक आपचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया (Gopal Italia) यांनी येणाऱ्या काळात नागरिकांनी सर्व निवडणुकीत काम करणाऱ्या सामान्य माणसाला निवडून प्रशासनमध्ये इमानदार लोकांना पाठवावे असे मत मांडले. सर्व पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन व या भागाच्या विकास कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आप चे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत्त (Mukund Kirdat) हे म्हणाले की वारजे परिसरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम आदमी पार्टीचा काम की राजनीति मधून खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे येणाऱ्या काळात आपचे जास्तीत जास्त नगरसेवक या भागातून निवडून आम्ही आणणारच. (Aam Aadmi Party (AAP) Pune)

पुणे शहराचे कार्याध्यक्ष विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी या भागात निलेश वांजळेने (Nilesh Wanjale) नगरसेवक नसताना नगरसेवकांपेक्षा जास्त कामे प्रशासनाकडून करून घेताना काम की राजनीतीचे उत्तम उदाहरण म्हणजे निलेश वांजळे होय असे म्हणाले. (Aam Aadmi Party (AAP) Pune)

वारजे शिवणे उत्तम नगर कोंढवे प्रभागाचे (Warje Shivane Uttamnagar Kondhawe Prabhag) अध्यक्ष निलेश वांजळे हे म्हणाले की वारजे हा भाग 25 वर्ष मनपात Pune Municipal Corporation (PMC) जाऊन सुद्धा STP चे काम आत्ता वर्ष झाले चालू आहे, अजूनही वारजे करांना अधिकृत स्मशानभूमी नाही, आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या समस्या आहेत अंतर्गत रस्त्यांचे समस्या आहेत, धरणे उशाला असून सुद्धा पुरेसं पाणी या चारही गावांना मिळत नाही,या भागात मनपाच्या दवाखान्यात औषधांचा कायम तुटवडा असतो, उत्तम नगर भागाला अजूनही सरकारी दवाखान्यात फक्त लसीकरण केले जाते बाकी कोणत्या सुविधा इथे नाहीये. या भागातील सामान्य नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या सामान्य नागरिकांना जर निवडून दिले तर पाच वर्षात वरील सर्व समस्या आम्ही दूर करू शकतो असे मत मांडले.

या कार्यक्रमाला मुरलीतात्या बराटे, रॉबिन जेम्स, सुरेखा भोसले, पुनम साळुंखे,संतोष सांबरे, किरण भिंगारे,
अभिजीत वाघमारे,छाया भगत, अजित वांजळे, अक्षय शिंदे, विकास ठाकूर, शाहरुख कबीर, सारिका वांजळे,
प्रतीक पलसे, जयद्रथ भंडारवाड, राजू वाकचौरे, अनिता शिंदे, साहिल जवळेकर, नितीन रणदिवे, गोपी जोशी,
कशिष वाकचौरे, विश्वास कदम, रेखा ढगे, वैशाली पायगुडे, पद्मजा पळसे,मुमताज शेख, व इतर बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advt.

Web Title : Aam Aadmi Party (AAP) Pune | Inauguration of branch plaque at Warje on behalf of Aam Aadmi Party Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘… यापेक्षा थुंकणं चांगलं’, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची सयंमी प्रतिक्रिया, म्हणाले- ‘ती मोठी माणसं, आम्ही त्यांचा…’

Shasan Aplya Dari – Pune News | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणेशाहीमध्ये अडकलेला पक्ष ! जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते – आप राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया