Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी – प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा आहे. या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी केले. (Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune)

आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड (Pandharpur To Raigad) ही स्वराज्य यात्रा पिंपरी चिंचवड (AAP Swaraj Yatra In Pimpri Chinchwad) मध्ये पोचली त्यावेळी ते बोलत होते. दि. २८ मे रोजी पंढरपूरहून निघालेली ही स्वराज्य यात्रा सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात पोचली. सांगवी (Sangavi) शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही यात्रा पिंपरी संत तुकाराम नगर (Sant Tukaram Nagar Pimpri) जवळ छोट्या सभेमध्ये रुपांतरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न हा संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चामुळे गरीबांना या सुविधा मिळू शकत नाहीत. यावर आम आदमी पार्टीने यशस्वी पर्याय शोधला असून आज दिल्लीतील सरकारी शाळेत आमदारांची मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. आज दिल्लीत उत्तम अशा आरोग्याची सोय सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये उभे राहिलेले हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रातही उभे करायचे आहे. यासाठी पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळात पोचविण्याची ही यात्रा असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या उदंड प्रतिसादाने पिंपरी चिंचवड शहर दुमदुमून गेले होते.
यावेळी पक्षाच्या विविध योजनांची माहिती देणारे पथनाट्यही सादर केले गेले.
यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया (Gopal Italia), यात्रेसोबत असणारे पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे (Dhananjay Shinde), देवेंद्र वानखेडे (Devendra Wankhede), विजय कुंभार (Vijay Kumbhar), चेतन बेंद्रे (Chetan Bendre), संतोष इंगळे (Santosh Ingle), अमर डोंगरे (Amar Dongre), स्मिता पवार (Smita Pawar) यासह राज्याच्या विविध क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वराज्य यात्रेत मोठी गर्दी केली होती.

खराखूरा आम आदमी

यात्रेचा रथ ज्यावेळी संत तुकाराम नगर मध्ये पोहचला , त्यावेळी एक उंचापूरा माणूस तेथे असणाऱ्या दुचाकी
हलवत होता. त्यानंतर त्याने त्या जागेची स्वच्छता करण्यासाठी झाडू हातात घेतला.
अतिशय साध्या वेशात असलेली व्यक्ती म्हणजे राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालिया होते.
गुजरातमध्ये आम आदमी पक्ष रुजविण्यात प्रमुख भुमिका असलेले इटालिया या सभेच्या वेळी स्टेजवर न
जाता सर्वसामान्यामध्ये बसून सभेच्या नियोजनात एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे राबत होते.
‘ हा खरा आम आदमी ‘ या शब्दात पिंपरी चिंचवड च्या नागरिकांनी इटालियांचे कौतुक केले.

Web Title : Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | Aam Aadmi Party’s Swarajya Yatra is to teach common people to question the system – state president Ranga Rachure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणेशाहीमध्ये अडकलेला पक्ष ! जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते – आप राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana | संजय गांधी निराधार अनुदान योजनेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा