Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | ‘महाराष्ट्रात रयतेचे राज्य नाही, 50 कोटी घेऊन सरकार बनले’ – गोपाल इटालिया

पिंपरी चिंचवडसाठी मॉडेल नवे, त्यासाठीचं आप हवे - स्वराज्य यात्रेत घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | आम आदमी पार्टीची राज्यव्यापी स्वराज्य यात्रा दिनांक 3 जून ला पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झाली. शहरात पदयात्रा व जनसभा आयोजित करण्यात आली होती. दिनांक 28 मे ते 6 जून दरम्यान आम आदमी पार्टीने श्रीक्षेत्र पंढरपूर ते किल्ले रायगड या मार्गावर (Swaraj Yatra Pandharpur To Raigad) स्वराज्य यात्रा आयोजित केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) स्वराज्य यात्रेचे स्वागत यशवंत कांबळे (Yashwant Kamble AAP) यांनी सांगवी (Sangavi) येथे केले. उपाध्यक्ष संतोष इंगळे (Santosh Ingle AAP) यांनी दुपारी चार वाजता संत तुकाराम नगर (Sant Tukaram Nagar Pimpri) येथे भव्य पदयात्रेचे आयोजन केले.

 

महिला आघाडी अध्यक्ष सीता केंद्रे (Seeta Kendre AAP) यांनी जाधव वाडी (Jadhav Wadi) येथे रॅली काढून स्वराज्य यात्रेचे स्वागत केले. तसेच यात्रा मार्गावर शहरातील ठीक ठिकाणी हार पुष्पगुच्छ ओवाळणी करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. आकुर्डी गाव (Akurdi Gaon) येथे सायं. 7 वाजता स्वराज्य यात्रेनिमित्त जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. (Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune)

आप’चे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया (Gopal Italia) या जनसभेला संबोधित करताना म्हणाले की संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कल्याणकारी योजना,चांगले रस्ते,शासकीय आरोग्य सुविधा,गोरगरिबांची घरे ईई विविध कामासाठी पैसे नसतात.मात्र निवडणुका आल्यावर त्या जिंकण्यासाठी याच प्रस्थापित सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष करोडो रुपये घेऊन आपल्या वस्तीमध्ये मतदान विकत घेण्यासाठी येतात,मात्र आपल्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी पैसे नसतात. 50 कोटी घेऊन महाराष्ट्रात सत्तांतर होते,जनतेने निवडून दिलेली राज्यसरकारे पैशाच्या जोरावर पडली जात आहेत. लोकांच्या टॅक्स चा पैसा आमदार विकत घेण, सरकार पाडणं यात वापरला जातोय, विकास कामासाठी पैसा नसतो पण सत्ताधारी मंडळींना लोकांचं मतदान विकतघेण्यासाठी पैसा वापरत आहे, चांगलं आणि दर्जेदार शिक्षणचं भारताची गरिबी कमी करू शकत, जनतेनं आप ला संधी दिली पाहिजे. शिवरायांच्या स्वप्नातील रयतेचा विचार महाराष्ट्रात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पार्टीची स्वराज यात्रा जनताभिमुख कार्यक्रम देऊन विधानसभा,महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. कारण हा आम आदमी चा राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला आहे. (Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune)

सभेची प्रमुख वक्ते आपचे कोल्हापूर (Kolhapur AAP) कार्याध्यक्ष संदीप देसाई (Sandeep Desai) यांनी भक्ती पीठ पंढरपूर कडून शक्तिपीठ रायगड कडे यात्रा जात असताना आज भक्ती शक्तीचा संगम असणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्येही सभा होणे हा दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की आम आदमी पार्टी लाईट, पाणी, चांगला शाळा शिक्षण फ्री देते. परंतु हे फ्री नसुन जनतेच्या करातून जमा पैसा आहे भ्रष्टाचार न करता जनतेसाठी वापरला जातो. महाराष्ट्रातही अशा सुविधा आम आदमी पार्टी सत्ता आल्यानंतर देणार आहे.

 

आपचे शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे (Chetan Bendre AAP) यांनी पिंपरी चिंचवड महपालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) गत 5 वर्षाच्या भाजप आणि नंतरच्या प्रशासकीय कारभारावर टीका भाजप कार्यकाळातील कारभाराची CAG मार्फत ऑडिट ची मागणी केली. RTE ची सुविधा गरीब पालकांना लुटणारी आहेत त्यात बदल होण अपेक्षित आहे .
शिक्षणाचं बाजारी करणं थांबलं पाहिजे , आरोग्यच खाजगीकरण थांबला पाहिजे हाच आमचा पक्षाचा प्रमुख मुद्दा आहे.
महापालिका पिंपरी चिंचवड करांकडून कर वसूल करतोय परंतु सुविधा मात्र देत नाही.

आमची स्वराज्य यात्रा ही लोकशाही मजबूत करणारी असल्याचे संतोष इंगळे यांनी सभेमध्ये बोलताना सांगितले.
यावेळी आपचे नेते विजय कुंभार (Vijay Kumbhar), धनंजय शिंदे (Dhananjay Shinde), धनराज वंजारी (Dhanraj Vanjari),
संदीप देसाई, मुकुंद किर्दत (Mukund Kirdat), अजिंक्य शिंदे (Ajinkya Shinde), संदीप सोनवणे (Sandeep Sonwane),
अजित फाटक (Ajit Phatak) तसेच पिंपरी चिंचवड मधील आजचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला. चार जून रोजी निगडी प्राधिकरण (Nigdi Pradhikaran)
आकुर्डी रावेत – किवळे – देहूरोड (Akurdi – Rawet – Kiwale – Dehur Road)मार्गे स्वराज्य यात्रा रायगडाकडे रवाना झाली.

 

Web Title :  Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | ‘There is no ryot state in Maharashtra,
government was formed with 50 crores’ – Gopal Italia

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा