आपकडून ‘हे’ ६ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आगामी लोकसभा निवडणुकीकरिता सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशातच आज आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये ६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आपने ७ उमेदवारांपैकी ६ उमेदवार लोकसभेसाठी निवडले आहेत. आप नेता आणि दिल्लीचे संयोजक गोपाळ राय यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये निवडलेल्या ६ उमेदवरांची नावे जाहिर केली आहेत.

आपने पश्चिम दिल्लीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. आप दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर गोपाळ राय यांनी सांगितले की, सध्या पश्चिम दिल्लीसाठी कोण उभा राहणार यावर चर्चा सुरू आहे. लवकरच त्या नावाची घोषणा केली जाईल.

आघाडीसाठी काँग्रेसचा नकार
तसेच ते पुढे म्हणाले, हातमिळवणीसाठी काँग्रेससोबत आम्ही दोनवेळा चर्चा केली. पहिल्या चर्चेवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला. त्यानंतर शीला दिक्षीत यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनीदेखील नकार दिला. त्यामुळे आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही. आम्ही तर आघाडी करू इच्छितो. पण काँग्रेसकडून कोणताही हिरवा कंदील दाखवण्यात आला नाही.

आगामी लोकसभेसाठी आपचे उमेदवार खालीलप्रमाणे :

जागा                      उमेदवार
चांदनी चौक          पंकज गुप्ता

उत्तर पूर्व              दिलीप पांड्ये

पूर्वी दिल्ली           आतिशी

दक्षिणी दिल्ली       राघव चड्ढा

उत्तर पश्चिम         दिल्ली गुग्गन सिंह

नई दिल्ली            बृजेश गोयल