आम आदमी पार्टीची भद्रावती तालुका कार्यकारिणी जाहीर

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – आम आदमी पार्टीचे पूर्व विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांनी भद्रावती तालुका आम आदमी पार्टीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. युवकांची प्रामाणिकता, कार्य करण्याची जिज्ञासा आणि सामाजिक कार्याविषयी आवड या निकषांवर आधारीत पदाधिका-यांची नियुक्ती या कार्यकारिणीत करण्यात आली आहे.

तालुका संयोजक सोनल पाटील, सहसंयोजक विनीत निमसरकर, कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, सचिव सुमित हस्तक, सहसचिव नावेद शेख, युवा तालुका अध्यक्ष अभिषेक रंगारी, उपाध्यक्ष साहिल तांगडपल्लीवार, महिला अध्यक्ष अभिषा रंगारी, सदस्य राजेंद्र भुक्या, मृणाल खोब्रागडे, योगेश शेंडे यांची नियुक्ती या तालुका कार्यकारिणीत करण्यात आली.

तसेच भद्रावती शहर कार्यकारिणीमध्ये शहर संयोजक सोनू सिंग, सहसंयोजक अजय गायकवाड, शहर सचिव दीपक वनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.