Delhi Violence : ताहेर हुसेननं हिंदुंना धडा शिकवण्यासाठी रचला होता दंगलीचा कट, दिल्ली पोलिसांचा दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनने दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचवेळी त्याने सांगितले की, जेव्हा तो 2017 मध्ये आम आदमी पक्षाचा नगरसेवक झाला तेव्हापासून त्यांच्या मनात होते, आता मी राजकारण आणि पैशाच्या मदतीने हिंदूंना धडा शिकवू शकतो.

ताहिर हुसेनने दिल्ली पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की, मला ओळखीचे खालिद सैफी म्हणाले की, माझ्याकडे राजकीय शक्ती आणि पैसा दोन्ही आहेत, ज्याचा वापर हिंदूंच्या विरोधात केला जाईल. मी यासाठी नेहमी तयार आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर खालिद सैफी माझ्याकडे आला. तो म्हणाला कि, आता आपण गप्प बसणार नाही. दरम्यान, सीएए कायदाही राम मंदिराच्या निर्णयासह आला. आता मला वाटले आहे की, पाणी डोक्यावरुन गेले आहे. आता काही पावले उचलावी लागतील.

असा रचला कट
ताहिर हुसेनच्या कबुलीनुसार 8 जानेवारी रोजी खालिद सैफीने मुझें जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदशी शाहीन बागमधील पीएफआय कार्यालयात ओळख करून दिली. जिथे उमर खालिदने सांगितले कि, मारण्या- मरण्यासाठी तयार आहे. खालिद सैफी म्हणाला की, पीएफआयचा एक सदस्य दानिश आपल्याला हिंदूंविरूद्ध युद्धात आर्थिक मदत करेल. त्यासोबतच ताहिरने सांगितले की, पीएफआय कार्यालयात आम्ही योजना आखली, आम्ही दिल्लीत काहीतरी करू, जेणेकरुन हे सरकार हादरले जाईल. ज्यांनंतर, ते सीएए कायदा मागे घेतील. खालिद सैफीचे काम लोकांना भडकविणे आणि त्यांना रस्त्यावर उतरवणे हे होते.