2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’ सर्व जागा लढवणार – अरविंद केजरीवाल

गुजरात : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे (aam aadmi party) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जाहीर केले की, आप पक्ष आगामी 2022 वर्षीच्या होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अहमदाबाद येथे आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेतली. गुजरातमधील झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर आपने आता येत्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

गेल्या 27 वर्षांमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. आज गुजरातची जी अवस्था ते भाजपा (Gujrat BJP) व काँग्रेस (Congress) सरकारचे कारस्थान आहे. ते म्हणतात की काँग्रेस भाजपाच्या खिशात आहे. येथील व्यापारी घाबरलेले आहेत. शिक्षण खराब आहे आणि चांगल्या दर्जाचे रूग्णालयं नाहीत, कोरोनामध्ये गुजरात अनाथ झालं होतं. पण आज गुजरातला एक सक्षम पर्याय मिळाला आहे. गुजरातमध्ये वीज एवढी महाग का आहे? गुजरातमधील रुग्णालयं व शाळा चांगल्या का नाहीत? मात्र हे सर्व आता होईल. असा विश्वास केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिला आहे.

केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, दिल्ली मॉडेल वेगळं आहे आणि गुजरातचं एक वेगळं मॉडेल असेल.
आम आदमी पार्टी (aam aadmi party) गुजरातच्या लोकांच्या मुद्यांवर राजकारण करेल.
2022 च्या आगामी निवडणुकीत येथील जनतेच्या मुद्यांवर निवडणूक लढवली जाईल आणि चेहरा देखील इथलाच असेल.
केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी गुजरातच्या एका नव्या मॉडेलचं आश्वासन देत असं म्हटलं आहे.
आम आदमी पार्टीचे उमेदवार सर्व जागा लढवतील.
गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जात आहे, तर मग इथं का नाही? तशाप्रकारे इथल्या रूग्णालयांची परिस्थिती देखील गेल्या 70 वर्षांपासून सुधारलेली नाही.
परंतु, आता परिस्थिती बदलेल. असे देखील अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलं आहे. या दरम्यान, पत्रकारपरिषद सुरू असतानाच गुजरातचे माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आपमध्ये प्रवेश केला. यावर अरविंद केजरीवाल म्हणाले की, इसुदान गुजरातचे केजरीवाल आहेत.

Web Title : aam aadmi party to contest on all seats in the 2022 gujarat legislative assembly polls delhi cm arvind kejriwal

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दुर्दैवी ! चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील घटना

parambir singh and mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयाकडून चा परमबीर सिंह यांना पुन्हा मोठा दिलासा, 22 जूनपर्यत अटक नाही