Aamir Khan | आमीर खानच्या ‘त्या’ जाहिरातीवरुन ‘वादंग’, युझर्स म्हणाले – ‘तू हिंदू विरोधी आहेस’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील बहुतांश कलाकार हे जाहिरातीमधून झळकत असतात. परंतु त्यांनी केलेल्या जाहिरातीवरुन वाद होण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची जाहिरात असो, अलियाची (Alia Bhatt) असो किंवा इतर कलाकाराची यावरुन काही ना काही वाद निर्माण होत आहेत. अलियाने केलेल्या एका जाहिरातीचा वाद ताजा असतानाच आमिर खानच्या (Aamir Khan) एका जाहिराती वरून वाद निर्माण झाला आहे. आमिर खान (Aamir Khan) याने सीएट टायरची जाहिरात (CEAT Tyres Advertising) केली असून आता या जाहिरातीवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आमिरच्या या जाहिरातीवरुन हा हिंदू विरोधी (he is being anti hindu) असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

काय आहे जाहिरातीमध्ये ?
आमिर खानने (Aamir Khan) सीएट टायरची जाहिरात केली आहे. या जाहिरातीमध्ये आमिर एका मुलाला सांगतो की, अनार, सुतळी बॉम्ब, भुईचक्र हे सर्व फटाके आपली टीम जिंकली तर नक्की फोडणार आहोत. परंतु ते रस्त्यावर नाही. कारण रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नाही तर गाड्या चालवण्यासाठी आहेत. त्यामुळे आपल्याला फटाके फोडायचे आहेत पण ते सोसायटीच्या आवारात रस्त्यावर नाही.

सोशल मीडियावरुन टीका
आमिर खानची सीएट टायरची ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर (social media) त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे आमिर खान हा हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे नाराज झालेल्या युझर्सनी आमिरला आणि सीएट टायर्सना ट्रोल करत ते हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर बहिष्कार (Boycott) घालण्याची मागणी केली आहे.

 

यूजर्स कडून ट्रोल

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एका युझरने लिहिले आहे की, बॉलिवूडचे स्पेशल लोक हिंदू सणांना नेहमी लक्ष्य करतात.
तरी देखील हिंदू लोक त्यांचे सिनेमे पाहतात. आणखी एका युझरने आमिरला प्रश्न केला आहे की,
रस्ते हे नमाज आदा करण्यासाठी आहेत का? तर दुसरा एक युझर लिहितो, सीएट टायरवाल्यांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
युझर्सनी केवळ आमिरलाच ट्रोल केले नाही तर सीएट टायरचे मालक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांना देखील ट्रोल केले आहे.
एकाने हर्ष गोयंका यांना टॅग करत ट्विट केले आहे आणि ‘हिंदूफोबिक’ असे महटले आहे.
यावर दुसऱ्या एकाने लिहिले, मी तर आता सीएट टायर बदलून दुसरे टायर लावणार आहे. तसे इतरांनाही तसे करण्यास सांगणार आहे.

Web Title :-  Aamir Khan | aamir khan troll for his ceat tire ad users says he is being anti hindu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rains | पुढचे 5 दिवस कोकणासह घाट परिसरात मुसळधार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

Pune Crime | झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरायचा दुचाकी, पण ‘असा’ सापडला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Multibagger Stock | सप्टेंबरमध्ये 100 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणारे ‘हे’ Top-5 स्टॉक्स, जाणून घ्या तुमच्याकडे आहेत का हे शेयर?