‘सूरज पे मंगल भारी’ पाहण्यासाठी इरासोबत थिएटरमध्ये गेला आमीर खान ! आता होतोय ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं (Coronavirus Lockdown) बंद असणारे सिनेमा हॉल आता 8 महिन्यांनंतर खुले करण्यात आले आहेत. सूरज पे मंगल भारी (Suraj Pe Mangal Bhari) हा सिनेमाही रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी आमीर खान (Aamir Khan) मुलगी इरा (Ira Khan) सोबत थिएटरमध्ये आला होता. यानंतर त्यानं सोशलवर पोस्टही शेअर केली, परंतु त्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागला.

https://twitter.com/aamir_khan/status/1328679671710457856?s=20

जेव्हा आमीर खान सिनेमा हॉलमध्ये आला तेव्हा त्याला लोकांनी चहूबाजूंनी घेरलं. यावेळी त्यानं फोटोसाठी आरामात पोजही दिल्या. ट्विट करत त्यानं याबाबत माहिती दिली. आमीरनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, सिनेमा हॉलमध्ये सूरज पे मंगल भारी पाहायला जात आहे. दीर्घकाळानंतर मोठ्या स्क्रीनचा अनुभव घेण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे.

आमीरच्या या ट्विटनंतर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. लोकांचं म्हणणं होतं की, अद्याप कोरोना संपलेला नाही. अशात सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहायला जाणं योग्य असणार नाही. आमीरच्या या ट्विटमुळं काही लोक नाराजही झाले.

आमीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर आमीर खान लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात दिसणार आहे. 1994 मधील हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक म्हणजे लाल सिंह चड्ढा हा सिनेमा आहे. फॉरेस्ट गंप या सिनेमात टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका होती. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चन्दन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अभिनेत्री करिना कपूर आमीरसोबत काम करताना दिसणार आहे.