आमिर खानची मुलगी इराचा ‘भन्‍नाट’ व्हिडिओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आमिर खानची मुलगी इरा खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकताच तीने आपल्या सोशल मीडियावरून वर्क आउटचा एक व्हिडीओ टाकला होता. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये इरा एका रॉडला लटकून वर्कआउट करताना दिसून आली आहे. यामध्ये इरासमोर एक काठी दिसते काठीचे टोक सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरते इरा मात्र हे सगळं चुकवून आपल्या रोडला लटकून होती शेवटी ती खाली पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी इराच्या ग्लॅमर फोटोमुळे लोकांचे लक्ष आकर्षित केले होते. या फोटोमध्ये इराचा लूक एकदम हटके होता. स्मजी आई – मेकअप आणि कलर्ड केसांवाला लूक चांगलाच व्हायरल झाला होता.

इरा सध्या एका थिएटर प्लेचे दिग्दर्शन करत आहे. Euripides Medea हे त्या प्लेचे नाव आहे. ग्रीक मधील प्रकरणावर आधारित हा प्ले आहे. हा प्ले देशातील काही निवडक ठिकाणी दाखवला जाणार आहे. तसेच डिसेंबरमध्ये याचे एक स्पेशल स्क्रिनींग होणार आहे. आमिर खान ने देखील याआधी आपली मुलगी इरा सिनेशृष्टीत पदार्पण करणार आहे मात्र तीला चित्रपट निर्मितीमध्ये इंट्रेस्ट आहे.

Visit : Policenama.com