आमिर खानची ‘लाडकी’ इरा खानचं ‘या’ क्षेत्रात ‘पदार्पण’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी इरा खान एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. अशी माहिती समोर आली आहे की, लवकरच इरा दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करणार आहे. या प्रोजेक्टचा प्रीमियर याच वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आला आहे.

इरा थिएटर प्रॉडक्शनने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. Euripides Medea असं तिच्या प्लेचं नाव आहे. हा अ‍ॅक्ट ग्रीक ट्रॅजेडीवर आधारीत आहे. हा प्ले देशातील निवडक शहरांमध्ये दाखवला जाणार आहे. याची रिहर्सल लवकरच मुंबईत सुरु होणार आहे.

याबाबत बोलताना इरा म्हणाली की, “थिएटरने सुरुवात करण्यामागे कोणतंही कारण नाही. माझं थिएटरवर प्रेम आहे. हे खूप जादुई आहे. टेक्नॉलॉजीच्या या दुनियेत हे खूप रिअल आणि प्रॅक्टीकल आहे. प्ले करण्यासाठी मला अशी स्टोरी शोधायला हवी जी मला सांगायची आहे. माझ्या काही खास शैली नाही. मला हॉररमध्ये जास्त रस नाही. परंतु मी इतर स्टोरीसाठी नेहमीच तयार आहे.”

इराबद्दल सांगतना आमिर म्हणाला होता की, “इरा फिल्म इंडस्ट्रीत येण्यास इच्छुक आहे. परंतु तिला फिल्म मेकिंगमध्ये रस आहे. तर मुलगा जुनैदला अॅक्टींगमध्ये रस आहे.” इरा आमिर आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. आपल्या बॉयफ्रेंडमुळे ती याआधी चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B1dC1uAgq39/

आरोग्यविषयक वृत्त –