आमिर खानची मुलगी इरा खानने काढली भरती; आवश्यक आहेत 25 प्रशिक्षणार्थी उमेदवार, पगार देणार ‘एवढा’

पोलिसनामा ऑनलाईन : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान मानसिक आरोग्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहे. या कामासाठी तिला काही लोकांची आवश्यकता आहे. इरा खानने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून नोकर भरतीची माहिती दिली आहे.

इरा खानने आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, मानसिक आरोग्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी तिला 25 इंटर्नर्सची आवश्यकता आहे. तसेच तिने सांगितले की, हि इंटर्नशिप एका महिन्याची असेल. प्रत्येक उमेदवाराला 5 हजार रुपये दिले जातील.

इराला देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधील इंटर्नची आवश्यकता आहे, जेणेकरून ते वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना मदत करू शकतील. इराच्या मते, इंटर्नचे काम लोकांना कॉल करणे आणि ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणे एवढं आहे. यासाठी कामाची वेळ अथवा शिफ्ट 8 तासांची असेल आणि 22 मार्चपासून हे काम सुरू होणार आहे. जे स्वयंसेवा करण्यासाठी हे काम करण्यास तयार आहेत, त्यांच्याकडून इराने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

इरा खानला मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलणे आवडते. ती स्वत: नैराश्यातून गेली आहे. मागील वर्षी मानसिक आरोग्य दिनानिमित्त तिने एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. नैराश्यावर उघडपणे बोलल्याबद्दल इराचे कौतुक केले गेले आहे.

मात्र, इरा खानने जी भरती काढली आहे. त्यासाठी केवळ 5 हजार एवढाच पगार देण्यात येणार आहे. तसेच यासाठीचे काम हे शिप्टनुसार अर्थात 8 तासांचे असणार आहे.