home page top 1

आमिर खान ‘मोगल’ सिनेमात पुन्हा काम करणार कारण…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – गुलशन कुमार यांच्या जीवनावर तयार होत असलेल्या मोगल या चित्रपटात काम करण्याचे अभिनेता आमीर खान याने पक्के केले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर  ‘मी टू’ प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्याने या चित्रपटातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र आता  त्याने  आपण चित्रपटात काम करणार असल्याचे नक्की केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना आमिरने आपण या चित्रपटात काम करणार नसल्यचे म्हटले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर  ‘मी टू’ प्रकरणांत आरोप लागल्यानंतर  आमिरने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. कॅसेटकिंग नावाने ओळखले जाणारे ‘टी-सीरिज’ कंपनीने गुलशन कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला कि, हे प्रकरण न्यायालयात असून याबाबतचा न्यायनिवाडा करण्याचे काम न्यायालयाचे आहे. त्यामुळे माझ्या मनाला वाटेल ते मी करत असतो. मागील वर्षी मला जे वाटले ते मी केले. त्याचबरोबर आतादेखील मला जे योग्य वाटत आहे ते मी करत आहे. त्यामुळे लोकं काय म्हणतील याचा विचार मी करत नाही. तसेच लोकं  टीका करणार मात्र मी माझे काम करत राहणार.

दरम्यान, मोगल या चित्रपटात आमिर गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार आहे. टी सीरिजचे मालक आणि गुलशन कुमार यांचे पुत्र भूषण कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Loading...
You might also like