आमिर खानने दिल्या सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, युजर्सने केले आमिरला ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची पोर्न स्टार सनी लिओनीने नुकताच तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला आह. तिने तिचा वाढदिवस पती डिनेयल वेबर आणि आपल्या मुलासोबत साजरा केला. सनीला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिरने ट्विटरवर सनीला शुभच्छा दिल्या आहेत.

सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर युजर्सने आमिर खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आमिर खानशिवाय कोणीच प्रसिद्ध कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही. आमिर खानने सनीला शुभेच्छा देऊन हे सिद्ध केले की ते दुसऱ्या कलाकारांपेक्षा वेगळे आहे. अनेक युजर्सने आमिरला खुप ट्रोल केले.

एक युजरने आमिरला ट्रोल करुन म्हणाला की, सर तुम्ही या कोणत्या लाईनमध्ये आले. आमिरने याआधी अनेक प्रसंगी सनी लिओनीला मदत केली आहे. एका मुलाखतीत सनीला प्रश्न विचारला की, ‘तु पोर्न स्टार म्हणून काम केले आहे. तुला असे वाटते का ? की, तु आमिर खानसोबत काम करावे ? ‘ सनीची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीवर खुप टिका करण्यात आली.

आमिरने ट्विट केले की, ‘सनी मुलाखतीच्या वेळी खुप आत्मविश्वासाने दिसून आली. पण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीबद्दल मी काही बोलू शकत नाही. मला सनी लिओनीसोबत काम करायला छान वाटेल. मला सनीच्या भूतकाळविषयी काही हरकत नाही.’

सनी लिओनी आमिर खानच्या या प्रतिक्रयेला खुप आनंदी झाली होती. ती आमिरला धन्यवाद म्हणाली. सनीने याआधी सांगितले आहे की, ती आमिर खानचा खुप आदर करते. आमिरचे काम तिला खुप आवडते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like