‘या’ कारणामुळं आमिर खाननं घेतला रेखासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय ! कारण वाचून चकित व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कधीच एकत्र काम केलेलं नाही. बॉलिवूड स्टार आमिर खान आणि एव्हरग्रीन अभिनेत्री राखी हेही यापैकीच एक आहेत. या दोघांनीही कधी एकत्र काम केलेलं नाही. पंरतु यामागील कारण जर तुम्ही वाचलं तर तुम्ही चकित व्हाल.

आमिर आणि रेखानं एकत्र काम नं करणं यामागे खूप जुनी घटना आहे. हा किस्सा आमिर खानचे वडिल ताहिर हुसैन यांच्या काळातील आहे. 80 आणि 90 दशकात रेखा खूप मोठी स्टार होती. आमिरचे वडिल ताहिर यांच्यासोबत रेखा लॉकेट या सिनेमासाठी काम करत होती. यावेळी रेखाची जी वागणूक होती त्याचं आमिरनं बारीक निरीक्षण केलं होतं. ती सेटवरही उशीरा येणं, काम करण्याची तिची स्टाईल आणि त्यामुळं अनेकदा सीन पुन्हा शुट करावे लागायचे हे सगळं आमिरला खटकत होतं. हेच कारण होतं की आमिरनं ठरवलं की रेखासोबत कधीच काम करायचं नाही. म्हणूनच रेखा एवढी सुंदर आणि फेमस स्टार असूनही आमिरनं तिच्यासोबत कधीच काम केलं नाही.

रेखा कधीच कामाप्रति मेहनती नाही वाटली. उलट आमिर खानं प्रत्येक भूमिका अभ्यासपूर्ण आणि चोख पार पाडायचा. लॉकेट हा सिनेमा ताहिर यांचीच निर्मिती होती. आमिर आणि रेखा जेव्हा कधी एकमेकांसमोर येतात तेव्हा प्रेमानंच वागतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like