Coronavirus : बॉलिवूडला कोरोनाचा विळखा? अभिनेता आमिर खानला ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) याला कोरोना (COVID-19) ची लागण झाली आहे. आमिरच्या प्रवक्त्यानं याबाबत माहिती दिली असून त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनी कोरोना टेस्ट करावी असं आवाहन देखील त्यानं केलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर आता आमिर खान होम क्वारंटाईन आहे. कोविडच्या नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करत तो सध्या विशेष खबरदारी देखील घेत आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार अद्याप कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळं आता बॉलिवूडवर कोरोनाचं संकट वाढू लागल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा सिनेमांच्या शुटींगवर निर्बंध येण्याची भीती सध्या व्यक्त केली जाताना दिसत आहे.