‘क्लीन शेव्ड’ मधील आमिर खानचा ‘लुक’ व्हायरल, लांब दाढीला केलं ‘रामराम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. आपल्या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट परिपूर्णतेने करण्याचा त्याचा विश्वास आहे. अशीच काही परिपूर्णता त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटातही पाहायला मिळतील. या चित्रपटासाठी यापूर्वी आमिरने लांब दाढी, पगडी घालताना दिसला होता पण आता तो या चित्रपटाच्या पुढच्या शेड्यूलसाठी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B4_nGQ3h3k-/

https://www.instagram.com/p/B7-c413hBI8/

आमिर खान नुकताच दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये आला होता. महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलातील आमिरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये आमिर क्लीन शेव्ड लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये दिसत आहे की आमिरने अगदी केस लहान केले आहेत. कॅज्युअल कपड्यांसह डोक्यावर निळ्या रंगाची टोपी परिधान करुन आमिर एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटाचे क्रू मेंबरसुद्धा दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर लालसिंग चड्ढाच्या पुढील शेड्यूलच्या शूटिंगसाठी आला होता. लालसिंग चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. या हॉलिवूड क्लासिक चित्रपटामध्ये टॉम हॅन्क्स मुख्य भूमिकेत होते. आता आमिर लालसिंग चड्ढामध्ये ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याचे फोटो लीक झाले आहेत. अभिनेत्री मोना सिंग देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे.

अद्वैत चंदन दिग्दर्शित लालसिंग चड्ढा हा आमिरसाठी खास चित्रपट आहे. यापूर्वी आमिर 2018 मध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये दिसला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करु शकला नाही.