Aamir Khan-Kiara Advani | आमिर खान-कियारा अडवाणीच्या जाहिरातीवरून जोरदार राडा, लोकांनी व्यक्त केला संताप

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान आणि कियारा अडवाणी (Aamir Khan-Kiara Advani) यांची नवीन जाहिरात (Advertisement) आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अनेक लोकांकडून करण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकांनी या जाहिरातीवर जोरदार टीका केली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीसुद्धा जाहिरात ट्विटरवर शेअर करत त्यावर निशाणा साधला आहे. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Aamir Khan-Kiara Advani)

काय आहे नेमके जाहिरातीत?

एयू स्मॉल फायनान्स बँकेची (AU Small Finance Bank) ही जाहिरात आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Aamir Khan-Kiara Advani) यांनी नवविवाहितांची भूमिका साकारली आहे. लग्नानंतर कारमधून ते घरी जात असतात. पाठवणीच्या वेळी कोणीच रडलं नाही, यावर ते एकमेकांशी चर्चा करत असतात. कारमधून उतरल्यानंतर हे लक्षात येतं की नवरा हा नवरीच्या घरी राहायला आला आहे. वधूच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी तो तिच्या घरी राहायला येतो. आपल्या हिंदू धर्मात नववधू ही नवऱ्याच्या घरी गृहप्रवेश करण्याची प्रथा आहे. मात्र या जाहिरातीत आमिर खान वधूच्या घरी पहिलं पाऊल ठेवतो. त्यानंतर तो म्हणतो, “शतकांपासून चालू असलेल्या प्रथा चालूच ठेवण्यात काय अर्थ आहे? म्हणून आम्ही प्रत्येक बँकिंग परंपरेबाबत प्रश्न उपस्थित करतोय, ज्यामुळे तुम्हाला चांगली सेवा मिळू शकेल.”

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून व्यक्त केला संताप

‘मला हे समजत नाही की सामाजिक आणि धार्मिक प्रथा बदलण्यासाठी बँक कधीपासून जबाबदार आहेत? मला वाटतं या बँकेनं भ्रष्ट बँकिंग व्यवस्था बदलण्यासाठी काम करावं. अशी बकवास करतात आणि पुन्हा म्हणतात की हिंदू ट्रोल करत आहेत. मूर्ख,’ असे ट्विट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केले आहे. या जाहिरातीवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक लोकांनी टीका केली आहे. एवढेच नाहीतर जाहिरातीच्या निषेधार्थ अनेकांनी संबंधिक बँकेतील अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title :- Aamir Khan-Kiara Advani | vivek agnihotri on aamir khan kiara advani ad slammed for hurting religious sentiments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा