आमिर खानचा स्टाफ ‘कोरोना’ पॉझिटीव्ह, कुटुंबाची टेस्ट निगेटीव्ह, आईसाठी प्रार्थना

बॉलिवूड स्टार आमिर खान यानं त्याच्या स्टाफ मेंबरला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. आमिरनं ट्विटरवरून एक लेटर शेअर केलं आहे. त्यानं सांगितलं की, घरातील इतर लोकांचीही कोरोना टेस्ट झाली आहे जी निगेटीव आली आहे.

आमिरनं आपल्या लेटरमध्ये लिहिलं की, “मला सर्वांना हे सांगायचं आहे की, माझ्या स्टाफमधील काही लोकांना कोरोना झाला आहे. त्यांना लगेच क्वारंटाईन करण्यात आलं हे. बीएमसी अधिकाऱ्यांनी तातडीनं मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मी बीएमसीला धन्यवाद देतो. ते माझ्या स्टाफची खूप चांगली देखभाल करत आहेत. सोबत ते माझ्या सोसायटीला सॅनिटाईज आणि डिसइंपरेक्ट करत आहेत.”

https://twitter.com/aamir_khan/status/1277850257653555205?s=20

आमिर पुढे म्हणतो, “आमच्या सर्वांची कोरोना टेस्ट झाली आहेत आमचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मी माझ्या आईचीही टेस्ट करणार आहे. ती एकटीच अशी आहे जिची कोरोना टेस्ट बाकी आहे. प्लिज प्रार्थना करा की, माझ्या आईची टेस्ट निगेटीव्ह यावी. ज्या प्रोफेशनलिजमनं बीएमसीनं आमची मदत आणि केअर केली आहे त्यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो.” आमिर खाननं कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि स्टाफचेही मी आभार मानले आहेत.

आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर आमिर खान लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात दिसणार आहे. 1994 मधील हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक म्हणजे लाल सिंह चड्ढा हा सिनेमा आहे. फॉरेस्ट गंप या सिनेमात टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका होती. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चन्दन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या अभिनेत्री करीना कपूर आमिरसोबत काम करताना दिसणार आहे.