‘वर्कआऊट’ करता-करता पडली आमिर खानची मुलगी इरा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्टर आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. कारण मोस्ट ऑफ द टाईम ती सोशल मिडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या आयुष्यातील अपडेट सोशलवरूनच ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशलवर नेहमीच वहायरल होत असतो. त्यामुळे सोशलवर ती गाजतच असते. यावेळीही इराचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. ती एक्सरसाईज करताना पडली आहे. काहीसा विनोदी असा हा व्हिडीओ आहे.

इराने इंस्टाग्रामवरून तिचा एक्सरसाईज करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओत दिसत आहे की, इराचा बॅलन्स बिघडतो की आणि ती खाली पडताना दिसत आहे. इरा एका पोलला लटकली आहे. अशात तिचा ट्रेनर तिच्या आजूबाजूने स्टिक फिरवत आहे आणि त्याच्या पासून वाचण्यासाठी तिला सांगत आहे. इरा पूर्ण प्रयत्न करत स्टिकपासून वाचत आहे.

परंतु सेशनच्या शेवटी तिची ग्रिप सुटते आणि ती खाली पडते. इराचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इराला अद्याप जरी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे नसले तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच चर्चेत असते.

visit : Policenama.com