‘या’ बडया बॅनरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार आमिर खानचा मुलगा जुनैद !

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर (Aamir Khan) खानचा मुलगा जुनैद (Junaid) बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी कसून मेहनत करत आहे. काही दिवसापूर्वी तो मल्याळम सिनेमा इश्क ((Ishq) च्या रिमेकमधून इंट्री करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र ऑडीशनमधून रिजेक्ट झाला. या सिनेमाच दिग्दर्शन निरज पांडे करत होते. वडील अमीर खानने याबाबत जुनैदची कोणतीच मदत करायची नाही, असे ठरवले आहे.

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार जुनैद लवकरच यशराज बॅनरच्या (yashraj film) सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचे दिग्दशर्न सिध्दार्थ पी. मल्होत्रा करणार आहेत. जुनैद या चित्रपटात एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. जो ढोंगी बाबाचा भांडाफोड करणार आहे. या सिनेमात जुनैदच्या अपोझिट बंटी और बबली 2 मधून इंडस्ट्रीत डेब्यु करमारी शर्वरी वाघ ( (Sharvari Wagh) दिसणार आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत असणार आहे. सिनेमात जुनैद एका न्युजपेपर एडिटरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा यशराजकडून नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. जुनैद हा चित्रपट पीके मध्ये दिग्दर्शक राजकुमार हिराणीचा सहायक दिग्दर्शक होता.

You might also like