प्रायव्हेट एअरपोर्टवर करीना कपूरला ‘Hug’ करताना दिसला आमिर खान !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमिर खान सध्या आपला आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो अमृतसरला जात आहे. अशात अशी माहिती समोर आली आहे की, आमिर सेटवरच आपला 55 वा वाढदिवस साजरा करणार आहे. उद्या म्हणजेच शनिवारी (14 मार्च 2020) आमिर खानचा वाढदिवस आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर देखील दिसणार आहे.

अलीकडेच आमिर खान आणि करीना कपूर मुंबईतील प्रायव्हेट एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. यावेळी त्यांचे अनेक फोटो समोर आले जे व्हायरल होताना दिसले. आमिर खानला एअरपोर्टवर भेटल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हग केलं आणि एकमेकांचा निरोप घेतला. लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघंही कॅज्युअल लुकमध्ये दिसून आले. आमिर आणि करीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

https://www.instagram.com/p/B4_nGQ3h3k-/?utm_source=ig_embed

अद्वैत चंदननं डायरेक्ट केलेला लाल सिंह चड्ढा हा सिनेमा याच वर्षी क्रिसमसला रिलीज होणार आहे. अतुल कुलकर्णी यांनी हा सिनेमा लिहिला आहे. सिनेमात आमिरसोबत करीना कपूर लिड रोलमध्ये आहे. हा सिनेमा 1994 साली आलेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूड सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या सिनेमात टॉम हॅक्स प्रमुख भूमिकेत होता. फॉरेस्ट गंपप्रमाणेच हा सिनेमा परफेक्ट करण्यासाठी अनेक ओरिजिनल लोकेशन्सवर सिनेमाची शुटींग करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/B8iRP3AhLxt/?utm_source=ig_embed