फ्लाईटमधील आमिर खानचा ‘हा’ व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान ठग्स ऑफि हिंदोस्तानच्या अपयशानंतर आता लाल सिंह चड्ढाच्या तयारीला लागला आहे. अशातच आता आमिर खान एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.

आमिर खानचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका फ्लाईटमधील आहे. यात आमिर खान इकॉनॉमी क्लासमध्ये बसल्याचे दिसत आहे. आमिर खानला शेजारी बसलेले पाहून बाकी प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आमिरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सोशलवर आमिरच्या नम्रपणाचे कौतुक केले जात आहे. एका पैपराजीने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आमिर खानच्या या व्हिडीओवर एका युजर कमेंट केली आहे की, “आमिर भाई, माशाअल्लाह ! तुम्ही खरे हिरो आहात.” तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, “प्रत्यक्षात, ही साधेपणाची वास्तविक श्रेणी आहे.”

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर आमिर खानचा हा पुढील प्रोजेक्ट लाल सिंह चड्ढा आहे. १९९४ मधील हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक म्हणजे लाल सिंह चड्ढा हा सिनेमा आहे. फॉरेस्ट गंप या सिनेमात टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका होती. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चन्दन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा हा सिनेमा २०२० ला रिलीज होणार आहे.