‘पैलवान’ बबीता फोगाटच्या वादग्रस्त ट्विटच्या चक्करमध्ये ट्विटरवर ट्रेंड झाला ‘आमिर खान’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार आमिर खान यानं शुक्रवारी(दि 3 एप्रिल 2020 रोजी) कोणतंही ट्विट केलं नाही. तरीही आमिर खान ट्रेंड करताना दिसत आहे. पैलावान बबीता फोगाट हिनं केलेल्या एका ट्विटमुळं एवढं सगळं झालं. तिनं केलेल्या ट्विटमुळं आमिर खान ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे.

गुरुवारी(दि 2 एप्रिल 2020) बबीतानं निजामुद्दीनच्या घटनेवर भाष्य करत एक वादग्रस्त ट्विट केलं. तिच्या ट्विटमधील भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतला. यानंतर अनेकांनी तिला प्रश्न करायला सुरुवात केली. यानंतर तर गीता आणि बबीतावर सिनेमा तयार करणारा अॅक्टर आणि प्रोड्युसर आमिर खानही ट्रेंड करताना दिसला.

https://twitter.com/BabitaPhogat/status/1245414095492386821

अनेकांनी तिला असं म्हणत ट्रोल केलं की, तिला कोणीच ओळखत नव्हतं. आमिर खानच्या सिनेमानं तिला ओळख दिली. आमिर खानचं नाव मध्ये आल्यानंतर तिला आणखी एका ट्विटमध्ये स्प्ष्टीकरण द्यावं लागलं की, तिचं ट्विट हे त्या लोकांच्या विरोधात आहे जे डॉक्टर, पोलीस, नर्स अशा लोकांवर दगडफेक करत आहेत आणि त्यांचा आदर करत नाहीत. माझा हेतू कोणताही धर्म किंवा जाती विरोधात काही लिहण्याचा अजिबात नव्हता असंही बबीतानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारे आमिर खानचं नाव मध्ये आल्यानं तो ट्रेंड करताना दिसला.