‘या’ फोटोंमुळे आमिर खान ‘ट्रोल’ !

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटवल्याचा विरोध करणार्‍या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. असे असतानाही अभिनेता आमिर खान तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीसोबत फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट ’लाल सिंह चड्ढाच्या शुटिंगसाठी तुर्कीमध्ये गेला आहे. तिथे तो आपल्या आगामी चित्रपटाचं शुंटिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीतून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबत दिसून आला आहे. या फोटोवरून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

आमीर खानसोबतचे फोटो एमीन एद्रोगनने ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ’मला जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. फिल्ममेकर आणि दिग्दर्शक इस्तानबुलमध्ये आहेत. मला हे जाणून घेऊन आनंद होत आहे की, आमिर लवकरच आगमी चित्रपट ’लाल सिंह चड्ढा’चे शुटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील.’असे म्हटले आहे. दरम्यान,जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर तुर्कीने या निर्णयाचा विरोध केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हागिया सोफिया म्युझियनला पुन्हा मशीद बनवण्याच्या मुद्द्यावरून तुर्कीने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते एमीन अर्दोआन ज्यांची आमिर खानने भेट घेतली त्या नेहमी हिजाब घालतात. परंतु, तुर्कीमध्ये हिजाबवर बंदी होती. हिजाब घालून मुली युनिवर्सिटीत जाऊ शकत नव्हत्या. परंतु, अर्दोआन यांच्या पत्नी हिजाबमुळेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हत्या. काही लोक आमिरला या कारणामुळेही ट्रोल करत आहेत.