आमिर खानचा अजब दावा, म्हणाला – ‘मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो ती सुपरस्टार होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  सेटवरील आपल्या किस्स्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आता एक अजब दावा केला आहे. मी ज्या कुठल्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो त्या बॉलीवूडमधील सुपरस्टार होतात असा दावा त्याने केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. करिअरच्या सुरुवातीला अमिरला ही विचित्र सवय होती. तो त्याच्यासोबत काम करणा-या अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा. अनेक अभिनेत्री त्याच्या या खोड्यामुळे नाराज झाल्या होत्या.

काही वर्षांपूर्वी जो जीता वही सिकंदर या चित्रपटाच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी अमिरने हा थक्क करणारा किस्सा सांगितला होता. फराह खानने हा किस्सा सांगायला सुरुवात केली. आमिर भविष्य वाचण्याच्या निमित्ताने अभिनेत्रींचा हात हातात घेतो आणि त्यावर थुंकून पळून जातो. यावर आमिरन हा आरोप मान्य केला. तो म्हणाला, हे मी आजही करतो. दंगल चित्रपटाच्या वेळी मी अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या हातावर थुंकलो होतो. पाहा आज ते सुपरस्टार आहेत. अभिनेत्री जूही चावला आमिरच्या या कृत्याने चांगलीच नाराज झाली होती. 1997 साली इश्क सिनेमाच्या सेटवर सर्वांच्या समोर आमिरने भविष्य वाचण्यासाठी जूहीला हात पुढे करायला सांगितले. तिने हात पुढे करताच आमिर तिच्या हातावर थुंकला आणि त्याने पळ काढला. आमिरचा राग आल्याने जुहीने दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या शूटिंगला येण्यास नकार दिला. यावर आमिरलादेखील जूहिचा राग आला. या घटनेनंतर दोघेही काही वर्ष एकमेकांशी बोलले नाही. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा बोलू लागले आहेत.