आमिर खानच्या ‘3 इ़डियट्स’चा अमेरिकेमध्ये ‘बोलबाला’ ! ‘लॉकडाऊन’मध्ये सर्वात जास्त पाहिला गेला सिनेमा

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या भारतासह अनेक देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला आहे. अशात बॉलिवूड स्टार आमिर खान याचा 3 इडिट्स हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा असा सिनेमा आहे ज्याला देशासोबतच परदेशातही खूप प्रेम मिळालं आहे. सध्या हा सिनेमा अमेरिकेत सर्वात जास्त पसंत केला जाताना दिसत आहे.

चीननंतर आता 3 इडियट्स हा सिनेमा अमेरिकेत अटेंशन घेताना दिसत आहे. युएसमध्ये लॉकडाऊनच्या काळात आमिर खानचा 3 इ़डियट्स हा सिनेमा सर्वात जास्त पाहिला गेला आहे. फर्स्ट प्रेस जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, या सिनेमाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी या बातमीमुळं खूप खुश आहेत.

3 इडियट्स या सिनेमात आमिर खान, करीना कपूर, शरमन जोशी, आर माधवन, बोमन इराणी, असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 2009 साली हा सिनेमा रिलीज झाला होता, म्हणजे एका दशकापूर्वी. कमाईच्या बाबतीत सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले होते.

या सिनेमानं हॉलिवूडमधील अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे. द डार्क नाईट, एवेंजर्स इफिनिटी वार, इनसेप्शन, द शॉशांक रिडेंप्शन, मॅरेज स्टोरी आणि द प्लॅटफॉर्म या सिनेमांपेक्षा युएमधील लोक लॉकडाऊनच्या काळात 3 इडियट्स हा सिनेमा पाहणं पसंत करत आहेत.